नंदुरबार – आज 14 फेब्रुवारी च्या पहाटे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि शहादा पोलिसांनी सापळा रचून शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावाजवळ एका ट्रॅक्टर मधून नेला जाणारा सुमारे नऊ लाखाचा अवैध दारूचा साठा जप्त केला. ट्रॅक्टर सह जप्त मुद्दे मालाची किंमत 17 लाख रुपये आहे.
शहादा पोस्टे महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास हिम्मत कापुरे यांच्या फिर्यादीवरून लखन उर्फ गणेश दला भिल, वय- 28 वर्षे, रा. वाडी बुद्रुक, ता. शिरपुर जि.धुळे यास अटक करण्यात आली. कोणतेही दारूचे परमिट व दारु वाहतुकीचा परवाना नसतांना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असतांना मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक 14/02/2022 रोजी 00.45 वा. सुमारास पिंपर्डे गावाच्या 500 मीटर पुढे रस्त्याच्या कडेला बॉम्बे व्हिस्कीचे एकुण 110 खोके त्या प्रत्येक खोक्यात 180 मि.ली. च्या 48 प्लास्टिकच्या बाटल्या अशा एकुण 5280 बाटल्या प्रत्येकी एका बाटलीची किंमत 130 रुपये प्रमाणे 6 लाख 86, हजार 400 रुपये किमतीचा साठा त्याचबरोबर किंगफिशर स्ट्राँग बिअर नावाचे एकुण 39 कागदी पृष्ठाचे खोके त्यात प्रत्येक खोक्यात 500 मिलीचे 24 पत्रटी टीन असे एकुण 936 पत्रटी टीन एका टीनची किमंत 180/- रुपये प्रमाणे 1 लाख 68 हजार 480 /- रु. चा साठा, 55,200 /-रु.कि.चे. माऊन्टस 6000 सुपर स्ट्राँग बिअर, 7,00,000/-रु. कि. चे एक महिंद्रा कंपनीचे 575DI XP PLUSE मॉडेल असेलेले लाल रंगाचे ट्रॅक्टर त्याच्या पुढील दर्शनी भागावर पाठीमागील ट्रोली वर रजिस्ट्रेशन क्रमांक नव्हता. त्याचा चेसीस क्र. MBNGAALFTMNLO0306 व इंजीन क्रमांक NML2GCE0379 असा आहे. असा 16 लाख 10 हजार 80/-रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकासमवेत शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी लक्ष घातले असून पुढील कारवाई केली जात आहे. पुढील तपास परिपोसई जितेंद्र महाजन हे करीत आहेत.