ताबडतोब संपर्क करा अन युक्रेनमधे अडकलेल्या नातलगांची माहिती द्या : नंदुरबार जिल्हा प्रशासन

नंदुरबार – युक्रेन मध्ये अडकलेल्या नंदुरबार जिल्हयातील नागरीकांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करुन माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सद्या स्थितीत रशिया व युक्रेन देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशियाने युध्द घोषीत केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्हयातील नागरीक अडकले असल्यास तात्काळ सदर नागरीकांचे नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालयात संपर्क करून कळवावे. जेणेकरुन अडकलेले नागरीकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. याबाबत नंदुरबार जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईकांबाबत तात्काळ जवळच्या तहसिल कार्यालयास कळवावे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात 9284774034 / 8275313833 या क्रमांकावर संपर्क करुन कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी याव्दारे नंदुरबार जिल्हयातील सर्व नागरीकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!