नंदुरबार – जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मिशन खान्देश असून, स्वतः पुढाकार घेऊन ते लवकरच दौरे करतील, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी शहादा येथे युवक मेळाव्याला संबोधित करतांना दिली. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात राजकीय समीकरणे पुढील काही दिवसात बदलताना दिसतील काय? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
कार्याध्यक्ष सुरज चव्हाण हे सध्या ऊत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहादा येथे रविवार दि.5 सप्टेंबर रोजी युवक मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मेळाव्यात प्रारंभी शहादा येथील धनराज ईशी यांच्या बी. बॉईज ग्रुपचे कार्यकर्त्यांसह वडाळी येथील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या युवकांच्या कार्याध्यक्ष सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी सत्कार केला.
फक्त निरोपाची गरज; अनेक दिग्गज राष्ट्रवादीत येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे याप्रसंगी म्हणाले. मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नंबर एकचा पक्ष करू. निवडणुका येऊ द्या. जिल्ह्यातील अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल होतील. फक्त त्यांना निरोप देण्याची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे यांनी सांगितले. कार्याध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले, युवकांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांना जिल्हा दौऱ्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, युवा नेते अँड राऊ मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राजेंद्र वाघ, जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेवाळे, बी के पाडवी, शांतीलाल साळी, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, अलिम मक्राणी, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, जिल्हा सदस्य विष्णु जोंधळे, नगरसेवक इकबाल शेख, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष दानीश पठाण, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पवार, सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब, उपाध्यक्षा शिला मराठे, कुशल मोरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुवर, अॅड. रुपसिंग वसावे, सरचिटणीस जगदिश माळी, शहादा महिला तालुकाध्यक्ष रेश्मा पवार, नवापुर महिला तालूकाध्यक्षा हेमलता गावित, अक्कलकुवा महिला तालुकाध्यक्षा नर्गिस मक्राणी, युवक तालुकाध्यक्ष शहादा महेंद्र कुवर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबाडे, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष रोहित पावरा, विधानसभा नंदुरबार प्रभारी रविंद्र पाटील, अक्कलकुवा प्रभारीसंगिता पाडवी, महिला जिल्हा सरचिटणीस अलकानंदुरबार शहराध्यक्ष युवक लल्ला मराठे, बी. बॉईज अध्यक्ष धनराज ईशी, रानुलाल जैन, मिडीया सेल जिल्हा उपाध्यक्ष दिपक घोडसे, युवक कार्याध्यक्ष शहादा शहर शुभम कुवर, नंदुरबार शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, उपाध्यक्ष पंकज पाटील चित्रपट सेल जिल्हाध्यक्ष राजु पाटील, सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, अपंग सेल जिल्हाध्यक्ष आनंद पाटील आदी उपस्थित होते.