अंडरवर्ल्ड डॉनच्या पुतळ्याचे जिल्हाभरात दहन करून भारतीय जनता पार्टी करणार महाविकास आघाडीचा निषेध

नंदुरबार –  नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे ऊद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर यासह नंदुरबार शहरात जुन्या नगरपालिकेजवळील चौकात छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा समोर अंडरवर्ल्ड डॉनच्या पुतऴ्याचे दहन करून देशद्रोही मंत्री मलिक यांना पाठीशी घालणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मुंबईत सिरीयल बॉम्बस्फोट घडवून भारत देशाशी छुपे युद्ध पुकारणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या टोळीतील हस्तकांशी संबंध प्रस्थापित करणारे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जोरदार निदर्शने देखील करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचेेे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

तरी सर्व पदाधिकारी, तालुका व शहरातील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे. हे आवाहन करताना विजय भाऊ चौधरी यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारातील गुन्हेगार सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल कडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली होती. मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी चार मालमत्तेची प्रकरणे ईडी कडे चौकशीसाठी दिले होते. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडेही ते पुरावे दिले होते. हे सर्व पाहता महाा विकास आघाडी सरकारने ताबडतोब त्यांचा राजीनामाा घेणे अपेक्षित होते परंतु त्या उलट त्यांना पाठीशीी घालून देशाात आणि राज्यात जो गैरप्रकार कधी घडला नाही तो जाहीरपणे घडवण्याात आला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून याचा निषेध करतो. नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बरखास्त करावे; अशीही मागणी जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे. नवाब मलिकांनी देशद्रोह्यांना बॉम्बस्फोटातील आरोपींना कोणते असे सहकार्य केले की, ज्यामुळे या आरोपींनी मंत्री नवाब मलिक यांना कवडीमोल किमतीत जमिनी दिल्या; याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!