महिलांच्या कार्याचा गौरव करीत नंदुरबार तहसिल कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

 

नंदुरबार : तहसिल कार्यालय व युवारंग फाउंडेशन तसेच हिरकणी गृप नंदुरबार यांच्या सयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमांला खासदार डॉ.हिना गावीत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,नायब तहसिलदार रिनेश गावीत, युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद लुळे, हिरकणी गृपच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन झाली. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते जागतीक महिला दिनानिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा अंतर्गत नव महिला मतदारांना ओळखपत्र,‍ नव शिधा पत्रिकाधारंकाना शिधापत्रिका वाटप, विशेष कार्य करणाऱ्या मतदान केन्द्रस्तरीय अधिकाऱ्याचा सत्कार, तसेच धुणीभांडी करुन आपला संसार,आपले कुटूंब सांभाळत असलेल्या महिलेचांही सत्कारही यावेळी करण्यात आला.

प्रास्ताविकांत श्री.थोरात यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व विषद केले. तर आभार प्रदर्शन रिनेश गावीत यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसिल कार्यालयातील कर्मचारी तसेच युवारंग फाउंडेशनचे राहुल शिंदे, देवेंद्र कासार यानी परिश्रम घेतले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!