रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कॅनडा, अमेरिका, ब्राझिल, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या १३ जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षीच्या जून मासामध्ये त्यांचे गुणांकन ६६ टक्क्यांवर आले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मोदी यांचे गुणांकन तब्बल ८२ टक्क्यांवर होते; मात्र गेल्या २ वर्षांत त्यात घट झाल्याचे पहायला मिळाले. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या आस्थापनाने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना ७० टक्के गुणांकन मिळाले आहे. प्रत्येक आठवड्याला या सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वांत अल्प असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.