नंदुरबार – शहादा येथे मजूर वाहून नेणारी एक आयशर आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक झाल्यामुळे 3 जणांचा जागी मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले आहे गंभीर जखमी प्रवाशांना व मजुरांना शहादा रुग्णालयात हलविण्यात आले.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार ऊसतोड मजुरांना नेणारा एच 18 ए ए 98 53 या क्रमांकाचा आयशर शहादा शहरातील नवीन बस स्थानक जवळील रस्त्याने धावत असताना एका ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की आयशर गाडी अनेक फूट अंतरावर फेकली गेली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ही आयशर ऊसतोड मजुरांना घेऊन पंढरपूर कडे रवाना होत असताना ही घटना घडली तर धडक देणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून सुद्धा ऊसतोड मजूर प्रवास करीत होते असे सांगण्यात आले ट्रॅव्हल्स मधून ते गुजरात राज्यातील संगमेश्वर कडे रवाना होत होते तथापि अपघात एवढा भीषण घडला की दोन्ही वाहना ंचा बहुतांश भाग ठेचला गेला घटनास्थळी तातडीने नागरिक धावून आले ॲम्बुलन्स बोलावून जखमींना शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी देखील धाव घेतली. हा अपघात दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडला, परंतु जखमी आणि मृतांची ओळख पटवून पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत चालू होती.