वाचकांचे पत्र:
गणेशोत्सव सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा उत्सव या उत्सवामध्ये सर्वजण आनंदाने सहभागी होतात आणि हा सण मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर साजरा केला जातो.
गणेशाच्या आगमनाची तयारी छोटे-मोठे सर्वजण करतात. मोठमोठे गणेश मंडळ असो की घरामधील गणपती, मनापासून सहभागी होऊन त्याची तयारी करतात.
यावर्षी सर्वांनी फक्त आणि फक्त शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प करूया व गणेशाची कृपा संपादन करूया.
सजावटीमध्ये सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट करूया व पर्यावरणाची हानी टाळू या.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती विक्रीस असतात प्लास्टर ऑफ पॅरिस कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती नारळाच्या करवंट्या पासून बनवलेली होती आणि चॉकलेट पासून बनवलेल्या मूर्ती या धर्म शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहेत.
गणेश मूर्ती चिकणमाती किंवा शाडूमाती पासून बनवलेले असावी. तिची उंची एक ते दीड फुटापर्यंत असावी पाटावर बसलेली ,डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. शास्त्रानुसार बनवलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करून तिची मनोभावे पूजा करावी. व आशीर्वाद मिळवा ,तत्व ग्रहण करता यावे यासाठी मनापासून प्रार्थना करावी.
– सौ. आशा वटृमवार, संभाजीनगर (औरंगाबाद)