नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांचेही आगमन झाले.
याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी. आर पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
00000