नंदुरबार – येथील जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई पोलिस ऊपायुक्तपदी बदली झाली आहे. आयपीएस अधिकारी पी.आर. पाटील हे नवे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झाले आहेत.
अफू लागवड करणारे, मद्य तस्करी करणारे, गोवंश तस्करी करणारे तसेच दंगलखोर यांच्यावरील मोठ्या कारवाया केल्याने महेंद्र पंडित हे सदैव नंदुरबार वासियांच्या स्मरणात राहतील. एकाचवेळी 19 जण हद्दपार करण्याची कारवाई जिल्हा स्थापनेनंतर प्रथमच केली गेली. त्यांच्या कर्तव्यदक्षतेची साक्ष देणारा आदेश काढला गेला अन याच दिवशी त्यांच्या बदलीची ऑर्डर मुंबईतून निघाली हा अजब योगायोग घडला. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून जनमनात स्थान प्राप्त झालेले महेंद्र पंडित यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे.