नंदुरबार – भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या “सहाय्यक सचिव” पदी प्रा.हितेंद्र सतीश चौधरी, रा.पाडळदा, ता. शहादा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा.हितेंद्र सतीश चौधरी यांची नीती आयोग (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या (Human Rights council of india) “महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश व ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष ब्रिन्दावन मंडल यांच्या सल्ल्याने व श्री. जनार्धन मोंडल (नीती आयोग माजी सहसंचालक, ग्राहक मंचाचे चेयरमन आणि चंद्र शेखर डे (नीती आयोगाचे सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या द्वारे पारित करण्यात आले.
मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाला निसर्गदत्त मुलभुत अधिकार, हे अधिकार त्याला जन्मत:च मिळतात व सदर अधिकार अबाधित ठेवण्याची जवाबदारी प्रत्येकाची असते पण, तरीही वेळोवेळी त्यावर आक्रमण होतांना दिसते व ते अधिकार अबाधित राहण्यासाठी प्रयत्नांची तसेच सतत जागरुक राहण्याची आवश्यकता असते.
आयोगाला प्राप्त होणार्या ५० टक्के तक्रारीपैकी कार्यक्षेत्रात न बसणारी काही तक्रारी असतात या नॉन मेन्टेनेबल तक्रारी संदर्भात जनजागृती करणे, मानवी हक्काचे ऊल्लंघन झालेल्या प्रकरणांची जवाबदार यंत्रणेला दखल घेण्यास मदत करणे किंवा भाग पाडणे,मानवतेचा व मानवी हक्काच्या प्रचार करणे आदी कार्य या माध्यमातुन केले जातात. या निवडी बद्दल प्रा.हितेंद्र सतीश चौधरी यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रा.हितेंद्र सतीश चौधरी हे ज्येष्ठ पत्रकार डॉ सतीश चौधरी यांचे चिरंजीव आहेत.प्रा.हितेंद्र सतीश चौधरी हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत, ते अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष, शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय पाडळदाचे सचिव, व्हीएसजीजीएम सदस्य, पत्रकार, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा.हितेंद्र चौधरी यांचा अनेक संघटनांच्या पदावर काम करण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे.