नंदुरबार – नंदुरबार सायबर सेलने धडाकेबाज कामगिरी बजावत ऑनलाईन फसवणूक झालेले १३ लाख ४६ हजार ६४८ रुपये परत मिळवून दिले. त्यामुळे त्या सर्व तक्रारदारांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचेसह सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व पथकाचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगीरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार दिपक चित्ते व पोलीस नाईक पंकज महाले, कन्हैया पाटील, चंद्रशेखर बडगुजर, हितेश पाटील, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही काळाची गरज बनलेली असून बरेच आर्थिक व्यवहार है। मोबाईलद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने केले जातात, त्यामुळे वेळेची बचत होवून वाचलेला वेळ हा चांगल्या कामासाठी वापरु शकतो, परंतु तोच मोबाईल काही वेळेस नागरिकांच्या अडचणी वाढविण्याचे कारण ठरु शकतो. दिनांक ०५/०१/२०२२ रोजी ऑनलाईन सायबर पोर्टलवरील नंदुरबार शहरातील तक्रारदार दिपक शिंदे यांना दिनांक ०५/०१/२०२२ रोजी त्यांचे गॅस एजन्सीचे कार्यालयात असतांना त्यांचे SBI Yono अॅप्लीकेशन चालु होत नसल्यामुळे त्यांनी गुगल वर जावुन SBI कस्टमर केअरचा नंबर शोधला त्या नंबरवर तक्रारदार यांनी संपर्क केला असता त्यांनी तक्रारदार यांना Any Desk नावाचे अॅप्लीकेशन इंन्स्टॉल करण्यास सांगुन तक्रारदार यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. व तक्रारदार यांचे खात्यातून ४,२०,०००/- रुपये ऑनलाईन कपात करुन त्यांची फसवणुक केली. बाबतचा प्रकार तक्रारदार यांना समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेल, नंदुरबार येथे संपर्क करुन सायबर सेल, नंदुरबार येथे समक्ष येवुन त्यांची झालेल्या फसवणुक बाबत हजर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहीती सांगुन ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. सायबर सेल, नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ तक्रारीवर कारवाई करत संबंधीत वॉलेट / बँकेशी समन्वय साधुन व वेळावेळी पाठपुरावा करुन फसवणुक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदार यांच्या खात्यात परत मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली. त्यामुळे तक्रारदार यांची एकुण ४२००००/- रुपयाच्या रकमेपैकी १५००००/- रुपयाची रक्कम तात्काळ वाचविण्यात यश आले. व रुपये १५००००/- हे लाभधारी खातेधारकाच्या बँक खात्यात गोठवून सदरची रक्कम ही मा. न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळणार आहे. म्हणुन तक्रारदार यांचे एकुण ३०००००/- रुपये वाचविण्यात सायबर सेल येथील पथकाला यश आले आहे.
दिनांक १८/१०/२०२२ रोजी ऑनलाईन सायबर पोर्टल वरील नवापुर येथील तक्रारदार विकास शहा यांना दिनांक १८/१०/२०२२ रोजी घरी ते असतांना त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला व त्या इसमाने तक्रारदार यांना सांगीतले की, तुमचे लाईट बिल ११ रुपयांनी कमी भरलेले आहे. म्हणुन ते भरण्यासाठी आम्ही तुमच्या मोबाईलवर पाठविलेली लिंक ओपन करा. असे सांगीतल्याने तक्रारदार यांनी सदरची लिंक त्यांचे मोबाईल मध्ये ओपन केली असता त्यांच्या खात्यातून अचानक २९८०००/- रुपये ऑनलाईन कपात झाले. बाबत त्यांना एसएमएस द्वारे समजले असता त्यांना समजले की त्यांची फसवणुक झाली आहे. म्हणुन त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी लागलीच नवापुर पोलीस ठाणे येथे धाव घेतली. नवापुर पोलीस ठाणे यांनी तक्रारदार यांना सायबर सेल, नंदुरबार
येथे संपर्क करण्याबाबत सांगीतले. तक्रारदार यांनी तात्काळ सायबर सेल नंदुरबार येथे संपर्क साधुन झालेल्या फसवणुक बाबत सांगुन ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. सायबर सेल, नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यात तत्परता दाखवत संबंधीत वॉलेट/बँकेशी तात्काळ समन्वय साधुन व वेळावेळी पाठपुरावा करुन फसवणुक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदार यांच्या खात्यात परत मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली. त्यामुळे तक्रारदार यांची एकुण २९८०००/- रुपयाची रक्कम वाचविण्यात यश आले. व दिनांक २९/१०/२०२२ रोजी तक्रारदार यांच्या खात्यातुन गेलेले २९८०००/- रुपये त्यांच्या खात्यात पुन्हा परत मिळवून दिले.
सन २०२२ मध्ये सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथेनंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फसवणुक झालेल्या ३६ पेक्षा अधिक लोकांनी तात्काळ सायबर पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यावर सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय तत्परतेने संबंधीत मोबाईल वॉलेट, बँक यांचे संबंधीत नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन व वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदार यांचे फसवणुक झालेले एकुण १३ लाख ४६ हजार ६४८ रुपये परत मिळवून दिले. त्यामुळे त्या सर्व तक्रारदारांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचेसह सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व पथकाचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.