नंदुरबार- मारहाण प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विसरवाडी येथील पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार येथील पथकाने आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळनंतर केली.
याप्रकरणी देण्यात आलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल न होऊ देण्याच्या मोबदल्यात पोलीस शिपाई (बक्कल नंबर १०२) दारासिंग जोरसिंग पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडून १०,००० रूपये लाच मागितली होती. तडजोडीअंती ८००० रुपये ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडुन पंच साक्षीदारासमक्ष ८०००/- रुपये लाच स्वीकारतांना दारासिंग जोरसिंग पावरा यांना रंगेहात पकडण्यात आले.
अॅन्टी करप्शन ब्युरोच्या नंदुरबार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. या सापळा कारवाईत विसरवाडी पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालु आहे. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक माधवी एस. वाघ, पोलीस हवालदार वित्षस पाटील, पोनायक अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे यांचा समावेश होता. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे पोलीस शिपाई दारासिंग जोरदार पावरा, वय-३५, (नेमणुक विसरवाडी पोलीस स्टेशन (वर्ग-३), ता. नवापुर जि.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.