गांधीनगर – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण होणार नवीन मुख्यमंत्री, याची उत्सुकता अखेर संपलीअसून आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.
भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, “भूपेंद्र पटेल लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गांधीनगरमध्ये भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं.” घोषणा होताच मावळते मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी पेढा भरवून उपेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले. नंतर नवनिर्वाचित विधिमंडळ नेते भूपेंद्र पटेल यांनी सायंकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल यांची भेट घेतली.
असे म्हटले जाते की, मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री विजय रूपणी यांच्याविषयी गुजरात राज्यात नाराजी निर्माण झाली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला हा धोक्याचा इशारा वाटला. म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ताबडतोब बदल घडवत रुपानी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची निवड केली आहे.