हिंदुत्वाची धगधगती तेजस्वी मशाल केतनभाऊ रघुवंशी..! 

लेखक : भावेश येवलेकर, (हिंदू सेवक), धुळे

सध्याचा जमाना हा ‘मेरा सपना मनी मनी’ म्हणणाऱ्या नव्या पिढीचा आहे. धर्मप्रेम राष्ट्रप्रेम याच्या गप्पा मारता मारता पैशाची माळ जपणाऱ्या ढोंगी धर्मप्रेमी सगळीकडेच पाहायला मिळतात. परंतु अपवाद सगळ्याच गोष्टींना असतो.  त्याप्रमाणे यालाही अपवाद आहे.  कोणताही गाजावाजा न करता खरोखरचे धर्म प्रेम निभावत समर्पित जीवन जगणारे आणि खरोखरचे राष्ट्रप्रेम जपताना वैयक्तिक सुखसोयींचा, लाभाच्या गोष्टींचा त्याग करणारे त्याहून अधिक संख्येने आपल्या भोवती असतात. डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्यांनाच ते आढळतात, हा भाग निराळा. तथापि हिंदुत्वप्रेमाने झपाटलेले आणि त्यासाठी कोणताही त्याग करायला, धाडस करायला तत्पर उभे राहणारे नंदुरबारचे केतन भाऊ रघुवंशी हे नाव त्यापैकीच एक आहे.

प्रखर हिंदुत्वासाठी आणि धर्मरक्षणार्थ सदैव तत्पर राहून केलेले धाडसी कार्य यामुळे सर्वपरिचित झालेले केतन दिलीपसिंग परदेशी (रघुवंशी) तथा केतनभाऊ रघुवंशी हे नाव माहित नाही असा व्यक्ती संपूर्ण खानदेशात सापडणार नाही. गोरक्षणार्थ आणि तत्सम धाडसी कार्य करता करता
सर्वांचे लाडके बनलेले केतनभाऊ रघुवंशी विद्यमान स्थितीत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. परंतु विशिष्ट प्रसंगात जाहीर उमटणारा त्यांच्यातील एक डॅशिंग धर्मप्रेमी कार्यकर्ता बहुपरिचित आहे आणि युवा समूह त्यांच्या पाठीशी असण्याचेदेखील हेच कारण आहे. मुघल आक्रमक अफजल खान याचा कोथळा काढतानाचे छत्रपती शिवरायांचे फलक झळकवायला प्रशासनाकडून बंदी असल्या विषयी निषेध नोंदवून तो फलक जाहीरपणे झळकवण्याचे धाडस एकमेव केतन रघुवंशी यांनी केले होते आणि त्यावरून दाखल झालेले गुन्हे झेलून धाडसाने सामोरे गेले होते. नंदुरबार शहरातील विशिष्ट वसाहतींमध्ये घराघरांमधून छुपेपणाने कत्तलखाने चालवले जात असल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने आक्रमकपणे आंदोलन छेडले तेव्हा केतन रघुवंशी यांची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे सुद्धा त्यांना वैयक्तिक पातळीवर फौजदारी खटल्यांना सामोरे जावे लागले. नंदुरबार शहरातून चोरट्या मार्गाने केली जाणारी गोमांस वाहतूक थांबवावी तसेच गो तस्करी बंद करावी यासाठी मागील काही वर्षांपासून जिल्हाभरात त्यांनी चालवलेली मोहीम नंदुरबार वासियांना आणि प्रशासनाला सुद्धा चांगलीच माहित आहे. त्यांचे धर्मकार्य एवढ्या पुरता मर्यादित नाही. हिंदू धर्मग्रंथांचा प्रसार झाला, हिंदू विचारांचा प्रसार झाला तर खऱ्या अर्थाने धर्मरक्षण होईल; यावर त्यांचा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांनी अत्यंत स्वस्त दरामध्ये विविध ग्रंथ पुस्तके आणि पोथी पुराणे लोकांना उपलब्ध करून दिली आहे. धार्मिक उपक्रमांना जमेल त्या पद्धतीने सढळ मदत देणे त्यांचे चालू असते. धर्मप्रेमींना व्यक्तिगत जीवनातील अडचणी सोडवून देण्यात अग्रेसर असतात. शिवाय विश्व हिंदू परिषदेतील मित्रांसमवेत लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिला व मुलींना सोडवण्यात तसेच त्यांची घर वापसी घडवण्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवत आहेत. सत्तरहून अधिक महिला आणि मुलींना त्यांनी यातून वाचवले आहे. जखमी होऊन रस्त्यावर पडणाऱ्या किंवा आजाराने व रोगाने पछाडलेल्या बेवारस गुरांना रात्री पहाटे धावत जाऊन वाचविणारे केतन रघुवंशी या नंदुरबार वासियांनी पाहिले आहेत. विद्यमान स्थितीत देखील त्यांच्या घर परिसरात वावरणाऱ्या काही बेवारस गाईंवर उपचारार्थ खर्च करत आहेत. एकीकडे सलमान आणि शाहरुख यांना आयडॉल मानून बाईलवेडे बनलेली तरुणाई दिसत असताना धर्म आणि राष्ट्र प्रेमाने भारावलेले केतन रघुवंशींसारखे युवक धाडसाने वाटचाल करीत राहावेत हे विशेष आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल असतानाही फेमसी मिळवण्याकडे मात्र ते कधी झुकले नाही.
गल्लीबोळात कुठेतरी चार पोरं पाठीशी घेऊन फिरले आणि कुठल्यातरी नुक्कडवर छोटा अन्नदानाचा कार्यक्रम घेतला की, शहरभर कार्यसम्राट बनल्याच्या थाटात फलक झळकावणाऱ्या गल्ली छाप दादांच्या यादीत केतन रघुवंशी कधीच गणले गेले नाहीत.
जळगाव धुळे नंदुरबार पासून नाशिक मुंबई पर्यंतचे असंख्य युवा कार्यकर्ते त्यांच्या मैत्रीच्या यादीत जोडले गेले आहेत. त्यांचा चाहता बनलेले युवक नंदुरबार शहराच्या प्रत्येक वसाहतीत पाहायला मिळतात. याला त्यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य कारणीभूत असावे. कोरोना महामारीच्या काळात रोज शेकडो जणांना जेवण पुरवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला. रघुवंशी समाज मित्र मंडळाच्या माध्यमातून वाघेश्वरी देवीच्या भक्तांना दरवर्षी मोफत वाहन सेवा पुरविण्याचा उपक्रम असो की दरवर्षी कुमारीका पूजन करणे असो, आपल्या समाजकार्याचा त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, समाजसेवी अशा वेगवेगळ्या प्रतिमेत दिसणारे केतन रघुवंशी खरोखरचे क्रीडाप्रेमी देखील आहेत त्यांनी अनेक गरीब खेळाडूंना सहकार्य दिले प्रोत्साहन दिले. व्यायाम पटूंना सहकार्य मिळवून देत त्यांच्यातील मल्ल घडवायला मदत देत असतात. शारीरिक बळ आणि आत्मबळ असेल तर महामारी सारख्या संकटाला तोंड देता येते,  हे कोरोना महामारी काळात पाहायला मिळाल्याने आपण आता जुन्या पडित व्यायाम शाळा पुनर्जीवित करण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे स्वतः केतन रघुवंशी म्हणतात.  अशा या बहुआयामी युवा नेतृत्वाची दखल राज्यस्तरीय नेत्यांनी सुद्धा घेतली आहे. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबारच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर हिनाताई गावित, माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या माध्यमातून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत त्यांची कारकीर्द पोहचली. परंतु या उगवत्या धाडसी कार्यकर्त्याला अडकवण्याचे प्रयत्न आघाडी सरकारच्या काळात झाले होते. थेट एम पी डी ए ची कारवाई घडवत हद्दपारचे आदेश काढले गेले होते. परंतु तत्कालीन गृहमंत्री केसरकर यांनी रघुवंशी यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्या प्रशासकीय हालचाली थांबविल्या होत्या. हिंदुत्वनिष्ठांना लक्ष बनवून राजकारणाच्या चक्कीत पिसून काढणारी सिस्टीम सर्वांनाच परिचित आहे. मात्र त्यालाही पुरून उरत केतन रघुवंशी यांनी धाडसी वाटचाल चालूच ठेवली आहे. आता केतन रघुवंशी यांनी राजकारणात भविष्य शोधण्याऐवजी केवळ धर्मसेवा आणि धर्मकार्यात समाधान शोधावे कार्यरत रहावे ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा असून स्वतः रघुवंशी यांनी देखील त्या संबंधित नवा संकल्प हाती घेणे अपेक्षित आहे.  त्यांची पुढील वाटचाल अशीच दमदार कसदार आणि चमकदार तेजस्वी बनत राहो,  त्यांच्या तेजस्वी कार्याची मशाल धगधगत राहो,  आणि ईश्वर त्यांना दीर्घायुरारोग्य प्रदान करो हीच वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!