नंदुरबार: राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती उत्कर्षा रुपवते या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
मंगळवार 7 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, नवापूर येथे आढावा बैठक. बैठकीत महिलाविषयक प्रकरणांचा आढावा, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती, बालविवाह संदर्भातील आढावा घेणार आहेत.
दुपारी 12 ते 12.30 वाजता नवापूर पोलीस स्टेशनला भेट व महिला दक्षता समिती व इतर विभागाचा आढावा. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय,नवापूर येथे महिला सामान्य विभाग (जनरल वार्ड) भेट व आढावा. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतर राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता आदिवासी विभागांतर्गत खडकी किंवा बोरचक आश्रमशाळेस भेट. दुपारी 4 ते 5 वाजता राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त समुपदेशन केंद्र, नवापूर येथे भेट. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार विश्रामगृहाकडे प्रयाण.
बुधवार 8 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, धडगांव येथे आढावा बैठक. बैठकीत महिलाविषयक प्रकरणांचा आढावा, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती, बालविवाह संदर्भातील आढावा घेणार आहेत.
दुपारी 12 ते 12.30 वाजता धडगांव पोलीस स्टेशनला भेट, महिला दक्षता समिती व इतर विभागाचा आढावा. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय,धडगांव येथे महिला सामान्य विभाग (जनरल वार्ड) भेट व आढावा. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता मांडवी ता.धडगांव आश्रमशाळेस भेट. 4 ते 5 वाजता राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त समुपदेशन केंद्र, धडगांव येथे भेट. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार विश्रामगृहाकडे प्रयाण.