मंत्री डॉ.विजयकुमार गावितांनी विद्यार्थ्यांशी साधला बोली भाषेतून संवाद; पालक आणि ग्रामस्थांची जिंकली मने

*नंदुरबार : भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. ही बोली भाषा जेव्हा शिक्षणाचं आणि संवादाचं सशक्त माध्यम होतं तेव्हा किती परिणाम साधू शकतो याची प्रचिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोली भाषेतून संवाद साधला तेव्हा आली. पालकमंत्री यांनी बोली भाषेतील या संवादाने उपस्थित, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांची मने जिंकून घेतली.

निमित्त होते नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कोठली आश्रमशाळेच्या मुलींच्या सर्व सोयाींनीयुक्त अशा भव्य वसतीगृहांच्या ४ इमारतींच्या उद्घाटनाचे.

आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं नंदुरबार तालुक्यातील कोठली इथं उभारण्यात आलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या चार इमारतींचं लोकार्पण आदिवासी विकास मंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शरद गावित,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक ,प्रकाश गावीत जि.प.सदस्य राजेश्रीताई गावित नटावद गावाच्या सरपंच जयश्रीताई गावित सर्व गावाचे सरपंच उपस्थित होते. व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित यावेळी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण सोपं व्हावं, यासाठी राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आवर्जून सांगिताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या आदिवासी मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त चार भव्य इमारती असलेली ही राज्यातील पहिली आय. एस. ओ. नामांकित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत ५३३ मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेत नंदुरबार जिल्ह्यातल्या सात गावातल्या पाणीपुरवठा योजनांचं भूमिपूजनही डॉ. गावित यांनी यावेळी केलं. नटावद धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी १८ कोटींहून अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हर घर नल योजने अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुध्द पाणी पोहोचवलं जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनीही मनोगत व्यक्त केले.

*यांचे झाले भुमीपूजन, पायाभरणी व उद्घाटन*

यावेळी उमर्दे,वेळावद ,लोय मोठे पिंपळेद,रतनपाडा, बर्डिपाडा,कोठली,धानोरा येथील पाणीपुरवठा योजनांचे भुमिपुजन, वाघाळा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभ व कोठली येथील मुलींच्या वस्तीगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!