32 आदिवासी गावांना कांदा-लसणाच्या लागवडीचा होतोय व्यावसायिक फायदा;  “राष्ट्रीय चर्चासत्रा”तून मिळाल्या उद्योग विकासविषयक मोलाच्या “टिप्स”

नंदुरबार –  MSME मंत्रालयाचे मुंबई विकास कार्यालय आणि “चेंबर फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिझनेसेस (CASMB)”, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदुरबार येथे ” एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र ” १४ मार्च २०२३ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योगांना विकास वाढीसाठी मार्गदर्शन करणे हा होता. शेतमाल व फळभाज्या प्रक्रिया संबंधित छोटे व मध्यम उद्योग करणाऱ्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 200 हून अधिक जणांनी या चर्चासत्रात उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. लहान असो की मोठा असो उद्योग उभा करण्यासाठी शासनाने भरपूर निधी आणि योजना उपलब्ध ठेवल्या आहेत परंतु उद्योग करू पाहणारे संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंत जिल्हाधिकारी खत्री यांनी व्यक्त केली आणि योजनांचा लाभ कोणाला कसा घेता येईल यावर मार्गदर्शन केले.
नोव्हेंबर २०२२ पर्यंत, GeM पोर्टलने रु.च्या १२.२८ दशलक्ष ऑर्डर दिल्या आहेत. 62,247 खरेदीदार संस्थांसाठी 5.44 दशलक्ष नोंदणीकृत विक्रेते आणि सेवा प्रदात्यांकडून 334,933 कोटी (US$ 40.97 अब्ज). सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या डेटानुसार (25 नोव्हेंबर 2022 रोजी शेवटचे अद्यतनित केले गेले), उद्यम नोंदणी पोर्टलने 12,201,448 MSME ची नोंदणी केली, 1 एप्रिल 2023 पर्यंत, अर्थ मंत्रालयाने सूक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी योजनेसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टमध्ये ₹9,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. मंत्रालय MSMEs ला *2 लाख कोटी अतिरिक्त संपार्श्विक मुक्त क्रेडिट देखील प्रदान करेल, तर क्रेडिट खर्च 1% ने कमी करेल, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
32 आदिवासी गावांना कांदा आणि लसणाच्या व्यावसायिक लागवडीचा होतोय फायदा
नंदुरबार जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे. निम्मी लोकसंख्या कृषी व्यवसायात गुंतलेली आहे. नंदुरबार जिल्ह्याचा कृषीविषयक विकास आणि जिल्ह्यातून कुपोषण दूर करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. सरकार लोकांना प्रशिक्षणाभिमुख उपक्रमांसाठी प्रोत्साहन देत आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात हातभार लागेल. कांदा, लसूण, मिरची ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्त्वाची पिके असून बाजरी या पिकांना निर्यात क्षमता असल्याने महत्त्व प्राप्त होत आहे. शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृषी-अन्न विभाग लक्ष देतो. आदिवासींच्या अन्न आणि पौष्टिक सुरक्षेतही हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. ICAR द्वारे आदिवासी उपयोजना (TSP)- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर (ICAR-DOGR) नंदुरबार जिल्ह्यातील 32 आदिवासी गावांना कांदा आणि लसणाच्या व्यावसायिक लागवडीचा फायदा झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. नोव्हेंबर २०२२ पर्यंत, GeM पोर्टलने रु.च्या १२.२८ दशलक्ष ऑर्डर दिल्या आहेत. 62,247 खरेदीदार संस्थांसाठी 5.44 दशलक्ष नोंदणीकृत विक्रेते आणि सेवा प्रदात्यांकडून 334,933 कोटी (US$ 40.97 अब्ज). सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या डेटानुसार (25 नोव्हेंबर 2022 रोजी शेवटचे अद्यतनित केले गेले), उद्यम नोंदणी पोर्टलने 12,201,448 MSME ची नोंदणी केली,अशीही माहिती देण्यात आली.
MSME मंत्रालय मुंबई विकास कार्यालयाचे सहाय्यक संचालक श्री प्रफुल उमरे यांनी योजनांची माहिती देऊन या जिल्ह्यामध्ये उद्योगिकता वाढावी यासाठी इच्छुकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व त्यासाठी काय करता येईल यावरकेले मार्गदर्शन केले. तसेच श्री गजानन डांगे (प्रेसिडेंट, योजक, सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्‍टेनेबल डेव्हलपमेंट-नंदुरबार) यांनी नंदुरबार मध्ये उद्योग विकासाकरिता अनेक कार्य करत असल्याचे आपल्या भाषणामध्ये नमूद केले. CASMB चे सेक्रेटरी जनरल श्री उमेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. CASMB चे संचालक श्री अमोद साळगांवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
        या कार्यक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे विविध उत्पादने व त्यांची विकास प्रक्रिया, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापाराची संभाव्यता, गुणवत्ता – नियंत्रण – सुरक्षा, बँक ऑफ इंडियाकडून योजनांची माहिती, TRIFED च्या योजनांची माहिती, ई कॉमर्स चा वापर करून उदयॊग वाढविण्यास संबंधित मार्गदर्शन, पॅकेजिंग डिझाईन लेबलिंग यांचा उपयुक्त वापर, MSME मंत्रालयाच्या योजना आदिसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विकास कार्यालयाचे सहाय्यक संचालक श्री प्रफुल उमरे व CASMB चे सेक्रेटरी जनरल श्री उमेश कांबळे यांनी सांगितले की, 1 एप्रिल 2023 पर्यंत, अर्थ मंत्रालयाने सूक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी योजनेसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टमध्ये ₹9,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. मंत्रालय MSMEs ला *2 लाख कोटी अतिरिक्त संपार्श्विक मुक्त क्रेडिट देखील प्रदान करेल, तर क्रेडिट खर्च 1% ने कमी करेल, अशी माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्याच्या विविध भागांतून आणि सर्व स्तरातून २०० हुन जास्त जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. अशा प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम करण्यासाठी MSME मंत्रालय प्रयन्तशील असून उपस्थित असणाऱ्या उद्योजकांना या कार्यक्रमाचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल
यांनी केले मार्गदर्शन
दरम्यान, दिवसभरातील चर्चासत्रात ‘उत्पादन आणि प्रक्रिया विकास (तेल – भुईमूग आणि कापूस बियाणे, फळे / केळी, पेरू, मिरची)’ या विषयावर श्री. राजेंद्र साहेबराव दहातोंडे, (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख KVK, नंदुरबार) यांनी, व्यवसायासाठी बाजरी (बाजरी- ज्वारी, बाजरी) ची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संभाव्यता विषयी (श्रीमती अमृता अशोक राऊत कृषी प्रक्रिया अभियंता, KVK धुळे) यांनी, वेबसाइट आणि ई- कॉमर्स साइट्स वापरून तुमचा व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवायचा, या विषयावर श्री तुषार मुकेश येवलेकर (अभियांत्रिकी वेबसाइट डेव्हलपर, ग्रोथ99 मध्ये पदवीधर)  यांनी तर पॅकेजिंग, लेबलिंग आणि डिझाइनिंग विषयी श्री तुषार बी. गोरे (फूड सायन्स अँड टेक केव्हीके, जळगाव) यांनी व ट्रायफेड विषयी श्री. शिवबसवन्ना गुलाप्पा चलवाडी (सहाय्यक व्यवस्थापक, ट्रायफेड) त्यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!