कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील बिनविरोध

नंदुरबार – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला..
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत १८ पैकी १७  जागांवर उमेदवार निवडून आले होते तर हमाल मापाडी मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार अशोक आरडे यांनी पाठिंबा दिल्याने सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया एकतर्फी झाली.
काल गुरुवार,१८ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा सहाय्यक उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यांना सहाय्य सचिव योगेश अमृतकर यांनी केले.विहित मुदतीमध्ये सभापतीपदासाठी विक्रमसिंग वळवी तर उपसभापती पदासाठी वर्षा पाटील यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. निवड झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती, उपसभापतींच्या सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, पालिकेचे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक परवेज खान, रवींद्र पवार,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील,तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, विविध गावातील सरपंच, उपसरपंच व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!