नंदुरबार – येथील निर्माते राकेश बोरसे व डॉ.खुशालसिंग राजपूत दिग्दर्शित आर्ट ऍण्ड म्युझिक यु!व-ट्युब चॅनल प्रॉडक्शनच्या ‘यावे गणराज तुम्ही…’ या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. या गाण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
डॉक्टर खुशालसिंग यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या गाण्याचे चित्रीकरण शहरातील उद्योगपती विलास राजपूत यांच्या बंगल्यावर करण्यात आले. चित्रीकरणाचा शुभारंभ छाया संगीत साधना विद्यालयाच्या संचालिका सौ.सुनिता चंद्रशेखर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथील उद्योगपती विलास राजपूत, भिमसिंग राजपूत, चंद्रशेखर चव्हाण, पंडीत लक्ष्मण बोरसे, अजयसिंग राजपूत, पंकज राजपूत, चेतन राजपूत आदी उपस्थित होते. गितकार ह.भ.प.रामकृष्ण धनगर हे आहेत तर त्यांच्यासमवेत स्वप्निल खैरनार यांनी गायले आहे. व्हीडीओ ग्राफर वनप्लस स्टुडीओचे (सुरत) मुकेशभाई शिंदे, कॅमेरामन दिनेश पाटील, राहुल बारापात्रे, योगेश पाटील यांचे यासाठी सहकार्य लाभले. आर्ट ऍण्ड म्युझिक यु-ट्युब चॅनलवर गाणे उपलब्ध आहे.