भरारी पथकाचा छापा; अक्कलकुवात दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार –  निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नवापाडा गावात ता.अ.कुवा जि.नंदुरबार याठिकाणी छापा टाकून परराज्यातील मद्यसाठासह रु.9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. 30/07/2023 रोजी डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, श्रीमती स्नेहा सराफ अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार कुडाची झोपडीत नवापाडा शिवार ता.अ.कुवा जि.नंदुरबार याठिकाणी छापा टाकला असता तेथे टयुबर्ग स्ट्रॉंग बिअर 500 मि.ली. क्षमतेचे एकुण 300 बॉक्स (7200 पत्री टीन) (हिमाचल प्रदेश निर्मित व हरीयाणा राज्यात विक्रीस असलेले) मुद्देमाल मिळून आला. सदर एकूण रु. रू.९,७२,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही श्री. डी एम चकोर निरीक्षक रा.उ.शु. भरारी पथकं नंदुरबार, श्री.बी.एस. महाडीक निरीक्षक रा.उ.शु.नंदुरबार श्री. एस.आर.नजन दुय्यम निरीक्षक, श्री सागर इंगळे दुय्यम निरीक्षक नंदुरबार श्री.प्रशांत एस.पाटील दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. नंदुरबार जवान सर्वश्री, श्री. हितेश जेठे श्री. संदिप वाघ, श्री.एम. के. पवार सहा. दु. निरीक्षक, श्री रामसिंग राजपुत सहा.दु.निरीक्षक श्री. मानसिंग पाडवी, श्री. धनराज पाटील श्री. हेमंत पाटील श्री. संजय बैसाणे, श्री. राहुल साळवे यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास डी.एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!