नंदुरबार – नंदुरबार जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने काल 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 वा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच आजादी का अमृत महोत्सव निमित्त आम आदमी पक्षाने नंदुरबार शहरातून अत्यंत जल्लोषात तिरंगा रॅली देखील काढली.
यावेळी आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविदास गावित, जिल्हा सचिव अरविंद वळवी, तालुका संपर्कप्रमुख ग्रामीण बिलदास गावित, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत शेकडो जणांनी सहभाग घेतला. हिंदुस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, ही रॅली नवापूर चौफुली ते वीर हुतात्मा शिरीषकुमार उद्यान पर्यंत निघाली. वीर हुतात्मा शिरीषकुमार उद्यान येथे तिरंगा ध्वजाला मानवंदना देत हुतात्मा स्मारकाला पुष्पहार घालून उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.