पालकमंत्री डॉ. गावित यांनी धडाकेबाज पद्धतीने केली एकाच वेळी 13 गावांमध्येमॅ रेथॉन भूमिपूजने, उद्घाटने

नंदुरबार – महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी एकाच दिवसात नंदुरबार तालुक्यातील 12 वेगवेगळ्या गावांमधील विविध विकास कामांचा धडाकेबाज पद्धतीने शुभारंभ केला. पालकमंत्री नामदार डॉक्टर गावित यांनी या विविध विकास कामांना पूर्वीच मंजुरी मिळवलेली होती तथापि त्यातील काहींचे भूमिपूजन, उद्घाटन आणि काही कामांचे लोकार्पण एकाच दिवसात पार पडले.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. गावांना विकास निधी मिळवून देण्यात पालकमंत्री यांच्या बरोबरीने भूमिका घेत असल्यामुळे डॉक्टर हिनाताई गावित आणि डॉक्टर सुप्रिया ताई गावित यांचे देखील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत करून सत्कार केला.जि.प.सदस्य श्री.शांताराम पाटिल भाजपा तालुकाध्यक्ष श्री.जितेन्द्र पाटिल प.स.सदस्य श्री.मंगल भिल यांच्यासह विविध गावांचे सरपंच,उपसरपंच व सदस्य आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 1 आक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमांत दरम्यान ना शिंदे आणि खोंडामळी या दोन ठिकाणी छोटेखानी सभा पार पडल्या तर अन्य सर्व ठिकाणी कोपरा सभेच्या माध्यमातून जनसंवाद करण्यात आला. त्याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री यांच्या समोर आपल्या विविध समस्या मांडल्या. मागील त्याला योजनेचा लाभ दिला जाईल तसेच प्रत्येक बेघराला घरकुल दिल जाईल त्याचबरोबर लवकरच गाय बकरी आणि कोंबड्या वाटपाचा शुभारंभ केला जाईल, अशा शब्दात पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी त्या ग्रामस्थांना आश्वस्त केले.

कोणत्याही जाती जमातीचा व्यक्ती असो, घरकुल, शौचालय, गॅस आणि तत्सम सुविधांपासून वंचित राहू नये हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर प्रत्येक गाव पाडा रस्त्याने जोडला जावा आणि घराघरात पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून रस्ते विकास चल मिशन योजना आणि घरकुल योजना यांचा जास्तीत जास्त लाभ लोकांपर्यंत पोहोचवला आहे; तथापि योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व वंचित घटकांनी पुढे यावे; असे आवाहन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्येक गावातील जनसंवाद प्रसंगी केले.

एकाच दिवसात 13 गावांमध्ये या कामांचा केला शुभारंभ

यात नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी जिल्हा परिषद गटातील गावांचा समावेश होता. एकट्या खोंडामळी गावात रस्त्यांच्या भूमिपूजना सह सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. भालेर गावात कॉक्रीट रस्ता, भालेर कोपर्ली रस्ता, राज्यसिमा सावळदे-कोरीट-रनाळा-शनिमांडळ रस्ता याचे भुमीपुजन, नगाव येथे कॉक्रीट गटारीचे भुमीपुजन, मौजे शिंदगव्हाण ता. जि नंदुरबार येथे 2515 अंतर्गत कॉक्रोट रस्त्याचे उदघाटन, शिंदगव्हाण येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत भुमीपुजन, काकर्दे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, नंदुरबार – भालेर कोपर्ली रस्ता, जुनेमोहिदे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, कोळदा खोंडामळी कोपर्ली रस्ता, हाटमोहिदे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे भुमीपुजन, बोराळे गावात स्थानिक विकास निधी अंतर्गत गुजर समाज वस्तीमध्ये समाज मंदिराचे भुमीपुजन,सुजालपुर गावात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन, कोरीट गावात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरणाचे भुमीपुजन, बामडोद रस्ता सुधारणा करणे कामाचे भुमीपुजन, खोंडामळी येथे सुजालपुर ग्रामा-225 ची सुधारणा करणे कामाचे भुमीपुजन, राज्यसिमा सावळदे – कोरीट-रनाळा-शनिमांडळ (रामा-7) रस्ता मध्ये विखरण येथे काँक्रीट रस्ता भुमीपुजन, विखरण येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन, नाशिंदे गावात आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण आणि ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे भुमीपुजन यासह विविध विकास कामांचा धडाकेबाज शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!