नंदुरबार रेल्वे स्थानकात सामूहिक शपथग्रहणाने स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ

पनंदुरबार – पश्चिम रेल्वे विभागातर्फे स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात असून आज दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक रित्या शपथ ग्रहण करीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला.

     नंदुरबार रेल्वे स्थानकाचे प्रबंधक निहाल अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सामूहिक रित्या शपथ घेतली. प्रवाशांसह सर्वांचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानक स्वच्छ राखण्याचा निर्धार करण्यात आला. 16 सप्टेंबर 2021 ते 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत हा स्वच्छता पंधरवडा बनवला जाणार असून त्याची रूपरेखा स्पष्ट करीत प्रबंधक निहाल अहमद यांनी तसेच रेल्वे स्थानक अधीक्षक वाणिज्य ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!