नंदुरबार – कॉन्क्रीट रोड निर्माण कार्यामुळे स्टेशन रोडची वाहतूक बंद करण्यात आली असून कंजरवाडा मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी नागरिकांना रायलाल नगर, कंजरवाडा प्रवेशद्वाराकडील मार्गे जा-ये करावी लागणार आहे.
अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी वरिष्ठ अनुभाग अभियंता, (कार्य) पश्चिम रेल्वे नंदुरबार यांना याविषयीचे पत्रर दिले आहे. त्यात म्हटले आहेे की, नंदुरबार स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर कॉन्क्रीट रोड तयार करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारा समोरील मार्ग दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पावेतो बंद ठेवण्यात येणार असून स्टेशनवर जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून रायलाल नगर, कंजरवाडा इकडील प्रवेशद्वाराचा मार्ग सुरू राहणार असल्याचे पुढे म्हटले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी नागरिकांना रायलाल नगर, कंजरवाडा प्रवेशद्वाराकडील मार्गे जा-ये करावी लागेल.