आजचा दिवस
परिवर्तिनी एकादशी, वामन जयंती
चांगला दिवस. भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त
ज्योतिष फलित विशारद व वास्तू विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. तथापि आज 17 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ८.०८ पर्यंतच विष्टी करण आहे. नंतर पूर्ण दिवस चांगला आहे. घबाड शुभ मुहूर्त आज उत्तर रात्री 3.36 पर्यंत आहे.
कलियुग वर्ष ५१२३ शालिवाहन शक १९४३
प्लवनाम संवत्सर, दक्षिणायन
वर्षाऋतू
भाद्रपद मास
शुद्ध पक्ष एकादशी
दिनांक 17 सप्टेंबर २०२१
वार – शुक्रवार, शुद्ध पक्ष दशमी
अयन – दक्षिणायन
नक्षत्र. – श्रवण (समाप्ती 17 रोजी पहाटे 3.36 वाजता)
योग – अतिगंड
करण – बव
चंद्र रास – मकर
दशमी समाप्ती 9.37 वाजता.
– सौ.निवेदिता जोशी.