सतर्कतेचा दिला ईशारा; चिरडा, धनपूर आणि दरा प्रकल्प क्षेत्रात पातळी वाढली

 

नंदुरबार – शहादा तालुक्यातील लघु पाटपंधारे प्रकल्प चिरडा, व मध्यम प्रकल्प दरा व तळोदा तालुक्यातील धनपुर या लघु प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले व धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे कार्यकारी अधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार विभागांतर्गत असलेल्या शहादा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना चिरडा, या प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत पाणी पातळीत 121.00 मी. ची नोंद झाली आहे. या प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे उमरी नाला काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपुर व इतर गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

तसेच शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी 309.20 मी. ची नोंद झाली आहे. प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे वाकी नदी काठावरील विरपुर, रामपुर, फत्तेपुर, शिरुड त. हवेली, कानडी त. हवेली, चिखली, ओरंगपुर, कोठली त. हवेली, परिवर्धा, वैजाली,नांदडे व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

तसेच तळोदा तालुक्यातील धनपुर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असून सद्यास्थितीत पाणी पातळी 114.50 मी. ची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाला असुन प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे निझऱ्या नाला काठावरील गावे मोठा धनपुर, छोटा धनपुर, सावरपाडा, मोड व इतर गावांनी सतर्कतेने रहावे.

या क्षेत्रातील नदी व नाला पात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने पात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!