नंदुरबार- दरवर्षाप्रमाणे यंदाही सद्गुरु सेवा संघ नंदुरबार संचलित श्री गजानन महाराज मंदिर 51 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, शेकडो भाविकांचे हात या महोत्सवाच्या पूर्व तयारीत जुंपले आहेत. या महाप्रसादासाठी सात क्विंटल बाजरीच्या भाकरी, दोन क्विंटल मसालेभात दोन क्विंटल बेसन दोन क्विंटल बुंदी इतका मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप होणार आहे.
श्री गजानन महाराज मंदिर, दुधाळे रोड, रिलायन्स मॉल च्या मागे, नंदुरबार येथे रविवार दिनांक:- 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत महाप्रसाद वाटप केले जाईल, असेही सद्गुरु सेवा संघाचे अध्यक्ष हिरालाल काका चौधरी व सर्व विश्वस्त मंडळ यांनी कळविले आहे.