नंदुरबार – संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या जीबीएस आजारा सदृश्य लक्षणे अक्कलकुवा तालुक्यातील दोन बालकां मध्ये आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तातडीने त्या गावांमध्ये पाणी नमुने यांची तपासणी करण्यासह सर्व उपाय योजना करण्याच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. तथापि यातील एकाच बालिकेमध्ये जी बी एस ची प्राथमिक लक्षणे दिसून आली आहे व अधिक तपासणीसाठी पुण्याला नमुने पाठवण्यात आले आहेत, असे शासकीय जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी 24 बेडचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जीबीएस चे लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय राठोड यांनी केले आहे.
प्राप्त माहिती अशी की अक्कलकुवा तालुक्यातील दोन बालकांना गेल्या आठ दिवसापासून सर्दी ताप व खोकल्यासारखे लक्षणे दिसून आले होते त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती त्यामुळे त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्या रक्ताच्या व विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्यात त्याच्या अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यात एका अकरा वर्षे बालिकेच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लहाडे यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ संजय राठोड यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णा रुग्णांसाठी 24 बेडचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे त्या ठिकाणी आवश्यक असलेली साधन सांभरगी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहे. 24 पैकी चार बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पाण्याचे नमुने तपासण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ मिताली सेटी यांनी पाण्याचे नमुने तपासणीचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे ही आवाहन त्यांनी केले आहे. जीबीएस आजाराबाबत नागरिकांनी कोणतीही धास्ती घेऊ नये हा आजार दुरुस्त होणार आहे या आजारात सुरुवातीला सर्दी खोकला ताप व त्यानंतर इतर लक्षणे दिसून येतात ही लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावा यासाठी जिल्हा रुग्णालयात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.