नंदुरबार :- राष्ट्रनिष्ठ, चारित्र्यवान आणि तेजस्वी पिढी जर या भारताला हवी असेल, तर देशात मुघलांचा इतिहास शिकवून चालणार नाही तर शिव शंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी जे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केले आहे त्याची दखल घेत शासनाने त्वरीत कबर उखडून टाकायला हवी, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भालेर, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिवराय यांना केवळ स्मारक, जयंती, चौक इतक्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आपल्या जीवनाचा आदर्श बनवायला हवे. या शिवजयंतीपासून पुढील शिवजयंती पर्यंत शिवचरित्र गावातील प्रत्येकाने वाचायला हवे. अनेक संकटांचा सामना करत, खचून न जाता महाराजांनी आपल्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले; परंतु आज देश स्वतंत्र होऊनही हिंदू स्त्रिया, गोमाता, मंदिरे, सण उत्सव आदी सर्व असुरक्षित आहेत, यासाठी शिवरायांचा आदर्श घेऊन भारतात हिंदू राष्ट्र अर्थात राम राज्य आणण्याचे ध्येय प्रत्येकाने ठेवायला हवे. यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे मन, मेंदू आणि मनगट प्रत्येकाने मजबूत करायला हवे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे डॉ. श्री. सतीश बागुल यांनी केले.. या व्याख्यानाची नियोजन भालेर येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी श्री पवन पाटील, वैभव पाटील, हेमंत पाटील, भावनेश पाटील, निलेश पाटील, प्रमोद पाटील,
मेहुल पाटील, स्वप्नील पाटील,
धीरज बोरसे आणि बादल पाटील आदींनी उत्साहाने केले.