आगामी निवडणुकीत युती नाहीच; फक्त भाजपाच जिंकणार: मा.मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती

नंदुरबार – आज रविवारी आमदार निवासस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुकाध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन तालुका अध्यक्ष यांना माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे. पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल; असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याचे लाडके नेते तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना डॉक्टर गावित यांनी स्पष्ट सांगितले की, आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही. निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकामध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही. जे आपल्या विरोधात लढतात, आपण त्यांच्याशी युती करायची हे बरोबर होणार नाही. जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार आहे म्हणून संघटित आणि एकत्रितपणे लढू या,  असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
आम्ही ज्या पक्षात जातो त्या पक्षाशी एकनिष्ठ राहतो हे आतापर्यंत दाखवून दिलं आहे. आम्ही आमच्या विरोधात प्रचार केला बाजूने प्रचार केला अशा चर्चा आमचे विरोधक पसरवत असतात परंतु आम्ही तसे केलेले नाही जर केले असते तर नुकत्याच होऊन गेलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे  किमान तीन लोक पराभूत झालेले दिसले असते. तथापि आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत आणि पक्ष वाढीसाठीच लावणार आहोत; असे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून व्यापक आणि रचनात्मक काम करण्या विषयी सुचित केले. दरम्यान, नवनियुक्त तालुका अध्यक्ष दीपक पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, आपले सर्वांचे लाडके नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या दमदार नेतृत्वात आपण त्याच स्वरूपाचे दमदार कार्य पक्षासाठी करून दाखवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!