शनिशिंगणापूर (नगर) – येथील मुख्य रस्त्यावर २ ‘लटकूं’नी (लटकू म्हणजे ठराविक दुकानातून पूजा साहित्य घेण्यास भाग पाडणारे) १७ सप्टेंबर या दिवशी साहाय्यक फौजदार बाळू मंडलिक यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ‘लटकू हटाव’साठी विशेष पथक सिद्ध करून कार्यवाही केली. त्यानंतर रस्त्यावरील सर्व ‘लटकू’ एका शनिशिंगणापूरमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून २०० हून अधिक दिवसात हद्दपार झाले.
येथे मोठ्या संख्येने ‘लटकू’ कार्यरत होते. ते ठराविक दुकानातून पूजा साहित्य घेण्यासाठी भाविकांना दमदाटी करायचे, तर काही ठिकाणी रस्ता अडवून पूजा साहित्य घेण्यास भाग पाडायचे. त्यांच्या विरोधात ‘यशवंत प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते; परंतु विशेष प्रभाव पडला नव्हता. ‘लटकूं’नी पोलिसांना मारहाण केल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यानंतर त्यांनी वरील कारवाई केली.