श्राद्ध विशेष लेखांक 2
श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि लाभ !
अध्यात्मशास्त्रात श्राद्ध कर्माला अनन्य साधारण महत्व आहे. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ? याविषयी त्यात सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘श्राद्धातून उत्पन्न झालेली ऊर्जा ही मृताच्या लिंगदेहामध्ये सामावलेल्या त्रिगुणांच्या ऊर्जेशी साम्य दाखवते; म्हणून अल्प कालावधीत श्राद्धातून उत्पन्न झालेल्या ऊर्जेवर लिंगदेह मर्त्यलोक पार करतो. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) मर्त्यलोक पार केलेला लिंगदेह परत पृथ्वीवरील सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येऊ शकत नाही; म्हणून श्राद्धाला अत्यंत महत्त्व आहे; नाहीतर वासनांच्या फेर्यात अडकलेले अनेक लिंगदेह व्यक्तीच्या साधनेमध्ये व्यत्यय आणून तिला साधनेपासून परावृत्त करू शकतात.’
पितृऋण फेडणार्या श्राद्धामुळे देवऋण आणि ऋषीऋण फेडणे सुलभ होणे :
‘ऋषी हे देवांपेक्षा कोपिष्ट असल्याने ते शाप देऊन जिवाला बंधनात अडकवू शकतात; परंतु पितृऋण हे कर्मवाचक असल्याने ते फेडायला अत्यंत सोपे आणि सहज आहे. श्राद्धविधीकर्मातून हे आपल्याला शक्य होते; म्हणून प्रत्येकाने इतर ऋणे चांगल्या तर्हेने फेडता येण्यासाठी देव आणि ऋषी यांना जोडणार्या पितृऋणरूपी दुव्याचा आश्रय घेऊन त्यांना विधीतून संतुष्ट करून त्या योगे मोक्षाची गती धारण करण्याचा प्रयत्न करावा. श्राद्धविधीकर्म केल्याने पितरांच्या साहाय्याने आपल्याला हळूहळू देव आणि ऋषी यांच्यापर्यंत पोहोचता येऊन वसु, रुद्र अन् आदित्य (‘वसु’ म्हणजेच इच्छा, ‘रुद्र’ म्हणजेच लय आणि ‘आदित्य’ म्हणजेच तेज, म्हणजेच ‘क्रिया’), या तिन्हींच्या संयोगाने अनुक्रमे पिता, पितामह आणि प्रपितामह यांचा उद्धार करता येणे शक्य होऊन देवतांचा आशीर्वाद मिळवणे शक्य होते.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’
संकलन : श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था
संपर्क क्रमांक : 92840 27180