कष्टकरी वंचितांच्या घरी जाऊन दिली तळोद्यातील जनकल्याण समितीने अनोखी भेट

नंदुरबार –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे तळोदा येथे आज दि 6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीज निमित्त शहरालगत भागात मंजुरीसाठी बाहेरगावाहून आलेल्या गोर गरिब, वंचित पोटाची खळगी भरण्यासाठी गावालगतच्या पडीक जागांवर तात्पुरता निवारा उभा करून रोजी रोटीसाठी धडपडणाऱ्या कुटूंबियांत जाऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी नंदुरबारहून पाठवण्यात आलेल्या साड्या व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाकार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुका कार्यवाह योगेश पाटील, जन कल्याण समितीचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, अॅड संदिप पवार, मूकेश बिरारे, सतिश सोलंकी, पंचभाई सर, भूपेंद्र बारी, गोलू बारी, शिवदास कोळी, योगेश सूर्यवंशी, छोटू प्रजापती, दूर्वेश मराठे आदि उपस्थित होते.

One thought on “कष्टकरी वंचितांच्या घरी जाऊन दिली तळोद्यातील जनकल्याण समितीने अनोखी भेट

Leave a Reply to Rajput mahendrasing Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!