‘पीएफआय’ संघटनेविषयी पुरोगामी विचारवंत गप्प का ?

‘पीएफआय’ संघटनेविषयी पुरोगामी विचारवंत गप्प का ?

(योगेंद्र जोशी)

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी  हिंदू जनजागृती समिती या संघटनेने लावून धरली असून देशभरातून यावर निवेदने दिली जात आहेत. यामुळे ‘ईसीस’ आणि ‘सिमी’ चा छुपा चेहेरा म्हटल्या जाणाऱ्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेच्या कारवाया चर्चेत आल्या आहेत. विशेष असे की, या देशविघातक संघटनेवर बंदी आणणे आवश्यक असल्याचा अहवाल केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यसरकारांनी याच यापूर्वीच गृहमंत्रालयाकडे पाठवलेला आहे. या संघटनेच्या माध्यमातून घडवले गेलेले प्रकार किती क्रूर आणि देशविघातक आहेत, हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे, असेच आहेत. हिंदू जनजागृती समितीने गृहमंत्रालयाकडे जे  निवेदन पाठवले आहे, त्यातील माहिती वाचल्या नंतर या भयानक वास्तवाची अधिक जाणीव होते.

अशा घातक संघटनांवर आपल्या भोवतालची तथाकथित विचारवंत मंडळी चिंता व्यक्त करीत नाहीत; ही अत्यंत धोकेदायक स्थिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि तत्सम हिंदू संघटनांवर ऊठसूट तोंडसुख घेणारे तथाकथित पुरोगामी नेते आणि विचारवंत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ च्या हिंसक कारवायांवर बोलायला का घाबरतात ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ च्या देशविघातक कृत्यांविषयी बोलणे टाळून अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आहेत का ? असे प्रश्न देखील यामुळे चर्चेत आले आहेत.

 

भारत सरकारचे म्हणजे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, वर्ष २००६ मध्ये केरळ येथे स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे. ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देशविघातक आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. या दृष्टीने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संदर्भात अत्यंत गंभीर अशी सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा अध्यक्ष अब्दुल रेहमान हा भारतात बंदी घातलेल्या ‘सीमी’ अर्थात ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेचा राष्ट्रीय सचिव होता, तर सध्याचा केरळ राज्य सचिव अब्दुल हमीद हा ‘सीमी’ या आतंकवादी संघटनेचाही राज्य सचिव होता.

 

एप्रिल 2013 मध्ये, केरळ पोलिसांनी नारथ, कन्नूर येथील प्रशिक्षण शिबिरावर छापा टाकला आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 21 कार्यकर्त्यांना अटक केली. देशी बनावटीचे बॉम्ब, तलवार, बॉम्ब बनवण्याचा कच्चा माल आणि ‘पीएफआय’च्या नावाची पत्रके पोलिसांनी जप्त केली होती. या 21 कार्यकर्त्यांवर ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA)’ नुसार देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जून 2011 मध्ये ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ अर्थात ‘के.एफ्.डी.’च्या सदस्यांनी म्हैसूरमधील एस्.बी.आर्. आत्. महाजन महाविद्यालय परिसरातून दोन मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. ‘के.एफ्. डी., ‘साठी निधी उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांची खंडणी त्यांनी मागितली होती. यासंदर्भात तत्कालीन कर्नाटक राज्य सरकारने केंद्र सरकारला ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्ग्रिटी’वर बंदी घालण्याची विनंती केली होती. हीच ‘केडीएफ’ नंतर ‘पीएफआय’मध्ये विलीन झाली. यासारख्याच केरळातील ‘नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट’ (एन्. डी. एफ्.), तामिळनाडूतील ‘मनिथा निधी पसाराई’ (एम्.एन्.पी.) यांसारख्या विखारी संघटनाही ‘पीएफआय’मध्ये विलीन झालेल्या आहेत…

वर्ष 2012 मध्ये केरळ शासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ विषयी केरळ उच्च न्यायालयाला माहिती देतांना सांगितले आहे की, ही संघटना देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत घातक असून ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘सिमी’चे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकार आहे.’ ‘सिमी’वर केंद्रशासनाने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातलेली आहे. या संघटनेचा विविध इस्लामिक आतंकवादी संघटनांशी संबंध असणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघटनेच्या 27 लोकांचा खून करणे, 86 जणांच्या खुनाचा प्रयत्न करणे आणि धार्मिक हिंसाचार करणे; असे अनेक हिंसक प्रकार या संघटनेने घडवलेले आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे सदस्य फेसबुकवर ‘इसिसचे सहानुभूतीदार म्हणून उघडकीस आले आहेत आणि हरकतउल जिहाद अल-इस्लामी’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’, ‘लष्कर-ए-तैय्यबा’ आणि ‘अल-कायदा’ यांच्याशीही त्यांचा संबंध असल्याचे उघड झाले आहे.
नागरिकत्व सुधारण कायदा (CAA) च्या विरोधात उत्तर प्रदेश राज्यात दंगली आणि हिंसाचार घडवल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 108 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याच्या दृष्टीने प्रक्रिया चालू केलेली आहे.
जानेवारी 2011 मध्ये, पीएफआय कार्यकर्त्यांनी केरळमधील प्रा. टी.जे. जोसेफ या ख्रिस्ती धर्मीय प्राध्यापकावर ईशनिंदा केल्याचा आरोप करत जीवघेणे आक्रमण केले आणि निर्दवीपणे त्यांचे दोन्ही हात कापून काढले होते. 8. पीएफआयची महिला शाखा ‘नॅशनल वूमन्स फ्रंट’ (एन्. डब्ल्यू.एफ्.) ची प्रमुख सायनाबा हिने मुसलमानेतरांना इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतरीत करण्याची संघटनेची योजना असल्याची कबुली दिली आहे.
या निवेदनामध्ये लिखाणाची मर्यादा असल्याने अधिक तपशील देणे उचित होणार नाही, असे नमूद करून समितीने म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्य सरकारांनी आणि कर्नाटकातील खासदारांनी केंद्र सरकारकडे ‘पीएफआय’ वर बंदी घालण्याच्या शिफारसी आणि केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण या बाबी या विषयाची गंभीरता स्पष्ट करतात. तरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि तिच्याशी संबंधित सर्व संलग्न संघटनांवर तत्काळ बंदी आणावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!