नंदुरबार – तिकीट दाखवायला सांगितल्याच्या रागातून रेल्वेतील दोन प्रवाशांनी तिकीट तपासणी सावर चाकू हल्ला केल्याची आणि त्याचाकू हल्ल्यात तिकीट तपासणीस गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 2 जून 2023 रोजी सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील चिंचपाडा येथे घडली.
याप्रकरणी आताच प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरत येथून भुसावळ कडे सुरत भुसावळ एक्सप्रेस निघाली. ही एक्सप्रेस रात्री सव्वा आठ वाजता नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली नंतर काही प्रवासी या एक्सप्रेसच्या डब्यात चढले तिकीट तपासणी करीत तिकीट तपासणीस सुधांशू हे त्याचवेळी त्या डब्यात येऊन पोहोचले त्यांनी प्रवाशांकडे तिकीट तपासणी करताना या प्रवाशांकडे देखील तिकीट मागितले तथापि तिकीट दाखवायला सांगितल्याचा राग येऊन त्यातील दोन जणांनी चाकू हल्ला केला असे सांगण्यात येत आहे तिकीट तपासणी सुधांशू यांच्या हातावर दंडावर चाकू लागून गंभीर जखम झाली त्याचवेळी काही प्रवासी त्यांच्या मदतीला धावून आले त्यामुळे हल्लेखोर धावत्या रेल्वेतून पसार झाले असेही सांगण्यात आले रात्री साडेनऊ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस येऊन पोहोचल्यावर जखमी तिकीट तपासणी यांनी रेल्वे पोलिसांकडे याची माहिती दिली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याचे समजते.