कॉन्स्टेबल इम्रान प्रकरणामुळे नंदुरबारमधील कथित ‘जिहाद’ चर्चेत 

नंदुरबार – कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला कॉन्स्टेबल इम्रान खाटीक याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून एक प्रकारे त्याने जिल्हा पोलीस दलाची इभ्रत आणि विश्वासार्हता धुळीस मिळवली. आता दुसऱ्यांदा तो जिल्हा पोलीस दलातून निलंबीत झाला आहे. शिवाय पोलीस रेकॉर्डवर नोंद नसली तरी महिलांच्या प्रकरणात त्याचे नाव याच्यापूर्वीही चर्चेत आलेले होते. असे असताना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून त्याला अद्याप कायमचे बडतर्फ का करण्यात आलेले नाही? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
धक्कादायक असे की, इम्रान खाटीक प्रकरणातील नोंदी पूर्ण करण्यात एकीकडे पोलीस गुंतलेले होते, त्याचवेळी बायपास रस्त्यावरील एका उद्यानात तसलेच दुसरे प्रकरण उघडकीस आल्याचे बोलले जात आहे. चर्चेत असलेल्या माहितीनुसार, काही युवकांनी संशयास्पद रित्या बसलेल्या एका प्रेमी युगुलाला हटकले. तेव्हा नागपूरहून येथे आलेला तो तरुण विशिष्ट समाजातील, तर त्याच्या प्रेमात पडलेली हिंदू महिला असल्याचे समोर आले. अधिक चौकशी करणाऱ्या युवकांच्या ताब्यातून मात्र तो संशयित तरुण लगेचच पसार झाला. त्याने फेसबुक वरून मैत्री साधली आणि प्रेमाच्या नावाखाली आपल्याला दोन लाखात लुबाडले, असे त्या संबंधित महिलेने नंतर सांगितले. तथापि या प्रकरणी अधिकृत कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही. एकंदरीत धार्मिक संदर्भ असलेल्या अशा घटना चिंता वाढवत आहेत, एवढे निश्चित.
कॉन्स्टेबल इम्रान खाटीक याच्या प्रकरणानिमित्त हेच मुद्दे हिंदू संघटनांनी उचलून धरले आहेत. नंदुरबारमधे कथित जिहाद प्रकार फोफावला आहे पण, त्याला पायबंद घालणारी कायदेशीर यंत्रणा जणू अस्तित्वात नाही; अशीही व्यथा हिंदू संघटनांचे पदाधिकारी मांडू लागले आहेत.
दरम्यान, आज दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी आरोपी कॉन्स्टेबल इमरान खाटीक याला पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लैंगिक अत्याचार संदर्भाने लावलेले कलम लक्षात घेता कॉन्स्टेबल इमरान खाटीक आता दीर्घकाळ गजाआड राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सातोदकर करीत आहेत. त्यांनी सांगितले की, हा आरोपी पोलीस कर्मचारी असला तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोरपणे कारवाई पार पाडली जात आहे. तरी कोणीही परस्पर अफवा पसरवू नये, शांतता राखावी; असे आवाहन त्यांनी केले आहे.
संदर्भ असा की, नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने फिर्याद दिली आहे व त्यात म्हटले आहे की, पोलीस अंमलदार इम्रान खाटीक याने जुनी ओळख दाखवून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वरून तिच्याशी मैत्री केली. नंतर प्रत्यक्ष भेटीत एकत्र फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान नंदुरबार शहराच्या बाहेरील बाबा रिसॉर्ट जवळ बोलावले. तिथून करजकुपे रोडवरील महिंद्रा पब्लिक स्कूल जवळील मैदानावर नेले. इम्रान अतिप्रसंग करू लागताच तिने आरडाओरड केली. तेव्हा धावून आलेल्या लोकांनी तिला सोडवले व इमरानला पब्लिक मार देऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या हवाली केले. त्यावरून कथित लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काही संघटना प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देण्यात आले.
इम्रान अडकलाय मोठ्या कलमात
उल्लेखनीय बाब अशी की, इम्रान खाटीक पोलीस दलातील असला तरीही, गुन्हा नोंदवताना आणि कलम लावताना पोलिसांनी काहीच हातचे ठेवलेले नाही. पोलीस कॉन्स्टेबल इमरान खाटीक याच्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यात लावलेले भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१) बलात्काराच्या गंभीर गुन्ह्या संदर्भातील आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून त्यात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. कलम ६९ हे लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवण्याविषयी आहे. यात १० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. हा देखील अजामीनपात्र गुन्हा आहे. कलम ७५(२) लैंगिक छळाचे असून ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. ७५(३) हे लैंगिक स्वरूपाच्या अश्लील टिप्पणी साठी असून १ वर्ष शिक्षेची, तर ३५१(२) हे गुन्हेगारी धमकी देण्याविषयीचे असून यात २ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तथापि या सर्व कलमांखाली गुन्हा नोंदविला असला तरी प्रत्येक आरोप स्वतंत्रपणे सिद्ध करावा लागतो. सर्व कलमांच्या शिक्षांची सरळ बेरीज करून अंतिम शिक्षा ठरत नाही. न्यायालयात आरोप सिद्ध होण्यावर सर्व अवलंबून राहील, हे स्पष्ट आहे.
मग, बळी पडणाऱ्या महिलांना वाचवणार कोण?
दरम्यान, कॉन्स्टेबल इम्रान खाटीक याने दिलेली क्रॉस कंप्लेंट दाखल करून घेत उपनगर पोलीसांनी नऊ जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही
दुसरी बाजू देखील गंभीर आहे. हिंदू महिलांना विशिष्ट जाती समूहातील लोक लैंगिक अत्याचाराचे लक्ष बनवतात; हे महाराष्ट्रसह देशभरात उघडकीस येणा अनेक प्रकरणातून रोज पाहायला मिळत आहे.  नंदुरबारमध्ये अद्याप त्या प्रकारचे मोठे प्रकरण ‘ऑन रेकॉर्ड’ आलेले नाही. तरीही इथे सर्व ‘ऑल वेल’ आहे, त्या प्रकारचे काहीच घडत नाही, असे म्हणणे शुद्ध भाबडेपणा होईल. नंदुरबार मध्येही त्याच पद्धतीने जाळ्यात ओढणे सुरू असून त्याचे अनेक दाखले हिंदू संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांकडे आहेत. धार्मिक संदर्भाने हिंदू मुली बळी पडल्याची अनेक प्रकरणे हाताळली जात आहेत. मात्र मुलींच्या आणि महिलांच्या कच खाऊ वृत्तीमुळे पोलीस रेकॉर्डवर अधिकृतपणे त्यातले काहीच येत नाही; हे निराळे विदारक सत्य आहे. प्रेम प्रकरणातून चाललेला जिहाद, जिम आणि सलून माध्यमातून चाललेला जिहाद आणि त्याला बळी पडणाऱ्या हिंदू महिलांची प्रकरणे तर नंदुरबार मधील तरुणांच्या चर्चेचा चविष्ट विषय असतो.
यावर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सखोल तपास करून या गैरप्रकारांचा बंदोबस्त करणारी कायदेशीर यंत्रणा अस्तित्वातच नाही शिवाय हिंदूंकडे पुरेसे पाठबळ नाही; यामुळे असामाजिक तत्त्वांना चांगलेच फावते आहे. ज्यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळाले त्यांच्या कृतीला कायद्याची साथ मिळत नाही. कायदा हाती घेतल्याच्या आरोपात ते कोणत्या ना कोणत्या कलमाखाली अडकून फौजदारी खटल्याला बळी पडतात. मग, षडयंत्राला आणि चुकीच्या आकर्षणाला बळी जाणाऱ्या हिंदू मुलींना व महिलांना वाचवणार तरी कोण आणि कसे? हा प्रश्न शिल्लक राहतो.
इम्रानला झालेल्या कथित मारहाणीचा संदर्भ
 एकंदरीत अशा हतबल पार्श्वभूमीमुळे नंदुरबार मध्ये छुपा संताप आहे. कॉन्स्टेबल इम्रान खाटीक याला झालेली कथित मारहाण त्याचाच भाग असू शकते. मारहाण झाल्याचा नुसताच खोटा आरोप आहे की खरोखर मारहाण केली गेली, हे कोर्टात सिद्ध होईल. परंतु नंदुरबार मधील जनसमूहात सूप्तपणे वाढत चाललेला संताप पुढे केव्हाही खरोखरचा विस्फोटक बनू शकतो. हे भयानक वास्तव आहे. पण, शेवटी पोलीस दल कायद्याचे गुलाम असते. त्यानुसार त्यांनी कॉन्स्टेबल इमरान खाटीक याला झालेली कथीत मारहाण ही कायद्याचे उल्लंघन मानून 9 तरुणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे. गुन्हेगाराच्या ताब्यातून महिलेला सोडवण्यात तरुणांचा दोष काय? हा प्रश्न तरुणांच्या पालकांना पडला आहे.
 पोलिसांच्या या कृतीला कोणी चुकीचे ठरवू शकत नाही. परंतु धार्मिक संदर्भाने आपल्याच माता भगिनी नाडल्या जातात, याचा राग संताप डोक्यात घेऊन फिरणाऱ्या मोठ्या समूहाच्या समाधानासाठी देखिल पोलिस दलाने तेवढेच तत्पर रहावे, ही अपेक्षा गैर ठरत नाही. हिंदू संघटनांचा रोष असाही आहे की, अनेकदा दंगली किंवा या प्रकारचे गुन्हे घडतात तेव्हा, विशिष्ट धार्मिक समूहाची रिएक्शन येऊ नये, याची दखल पोलीस आवर्जून घेताना दिसतात आणि केवळ त्या दबावाखाली हिंदू तरुणांविरुद्धच्या फिर्यादी दाखल करुन घेत फौजदारी खटल्यात ओढले जाते. हिंदू कार्यकर्त्यांच्या या म्हणण्यात तथ्य दर्शवणाऱ्या घटना अनेकदा निदर्शनास आल्या आहेत. पोलीस दलाने ती ब्रिटिश कालीन पद्धत संपुष्टात आणणे काळाची गरज आहे.
धर्मांतराचा संदर्भ तपासणार
हे लव जिहादचे प्रकरण असून पोलीस असल्याचा दबाव आणून इमरानने याच्यापूर्वी किती महिलांचे शोषण केले याची चौकशी केली जावी तसेच त्याच्या मोबाईल मधील व्हिडिओ क्लिप्स तपासण्यात यावे; अशी मागणी हिंदू संघटनांमधील कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, काही वर्षांपासून त्याच्या विरोधात महिलांच्या तक्रारी असल्याचे बोलले जात असले तरी कोणी महिला तक्रार द्यायला पुढे न आल्यामुळे प्रत्यक्ष पोलीस रेकॉर्डवर कोणतीही नोंद झालेली नव्हती; तथापि पोलीस दलाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असल्यामुळे आता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व शक्यता तपासल्या जातील. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून व्हिडिओ क्लिप्स आणि रेकॉर्डिंगची तपासणी त्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे. त्यांने केलेल्या लैंगिक शोषणाला धार्मिक संदर्भ आहेत की नाही हे देखील तपासले जाईल; असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. अमोल सातोदकर हे स्वतः करीत असून गुन्ह्यातील डिजीटल पुरावे गोळा करुन गुन्ह्याचा सखोल तपास करणेबाबत सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!